ओढ-अंतरीची
- सौ. स्वाती दांडेकर
क्षण भरांच्या मिलनाची वाट पाहते युगांन पासूनीकशी ही ओढ अंतरीचीसाद तुझी ऐकण्या साठी अधीर आहे किती मीदिवस सरला, रात्र गेलीघटका, पळ, सरता-सरताअनेक वर्ष पण निघुन गेलीसाद राहीली फक्त तुझ्या ओठा वरती वाट पाहीन मी अजुन तुझीसांग कशी ही ओढ अंतरीची ।।1।।
एक क्षण तुला पाहण्या साठीकिती वाट पाहते मीप्रतिक्षे मधे अधीर होतात डोळेवाहते अश्रु धारा समवेतअंतर मधले तेच राहीलेवाट पाहीन मी अजुन तुझीसांग कशी ही ओढ अंतरीची ।।2।।
माझ्या मनीची ओढ तुजलाआणेल जरूर माझ्या पाशीकिती ही दूर असला तरीसदैव राहील माझ्या हृदयाशीयेईल जरूर क्षण भाग्याचासंपेल रात्र युगांतरीचीजाणवेल तुजला ओढ अंतरीची ।।3।।