शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. लव्ह स्टेशन
  4. »
  5. लव्ह शायरी
Written By वेबदुनिया|

जीवन

ND
जीवन कधी असं असतं कधी तसं असतं।
कधी मनसोक्त हसायचं असतं

कधी एकदम शांत राहायचं असतं।
कधी कोणाला हात द्यायचा असतो

कधी अधिकार मिळवायचं असतं।
कधी अथक प्रयत्न करायचं असतं

म्हणून जसं आहे त्याच्याशी न्याय करायचं असतं
आणि समतोल व संयमित जगायचं असतं।

कधी मनसासून राहायचं असतं।
कधी खूप बोलायचं असतं

कधी कोणाला हात मागायचा असतो
कधी कर्तव्य निभवायचं असतं

कधी फक्त बसून गुरुमहाराजाचा जादू पाहायचं असतं।
जीन कधी असं असं कधी तसं असतं।

कारण जीवन जेव्हा असं असतं तेव्हा तसं नसतं
आणि जेव्हा तसं असतं तेव्हा असं नसतं।।

साभार : महाराष्ट्र साहित्य सभा, इंदूर यांच्या मालविका स्मरणिकेतून