रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 ऑक्टोबर 2021 (13:21 IST)

दिवाळी जोक: चला दिवाळीची साफ सफाई करायला

मंग्याची बायको सकाळच्या चहा सोबत काही औषधे घेऊन आली.
बायको -आहो ! हे घ्या तापाचं औषध. 
मंग्या - अगं पण मला ताप नाही.
बायको - तर मग हे घ्या, ऍसिडिटीचं औषध, 
मंग्या -अगं पण मला ऍसिडिटी पण नाही,
बायको- बरं, तर मग हे घ्या पोटदुखीचं औषध,
मंग्या - अगं मला पोटदुखी पण नाही,
बायको - ठीक आहे, मग हे अंगदुखीच औषध तरी घ्या,
मंग्या- अगं तुझं हे काय चालू आहे, मला काहीही झाले नाही ,
मी अगदी ठणठणीत आहे.
बायको- तुम्ही एकदम ठणठणीत आहात ना, 
मंग्या- हो, मी एकदम ठणठणीत आहे.
बायको- चला, तर मग आता काहीच बहाणे करायचे नाही, 
 आता दिवाळीची साफ सफाई करायला चला