मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: रविवार, 9 एप्रिल 2023 (13:31 IST)

Navra Bayko marathi joke नवरा बायको मराठी जोक

joke
बायको रागाने बघते 
नवऱ्याला जेवताना उचकी लागली की
बायको पाणी देण्याआधी 
रागाने बघते. 
 
 
बायको- अहो , हळदी कूंकुवाचं म्हणून 
बायकांना मेकअप बॉक्स देऊ का ?
नवरा- तुला एकटीलाच घे ते मेकअप बॉक्स,
बाकी बायकांना त्याची गरज नाही, त्या सगळ्या सुंदरच आहे. 
नवरा त्या दिवसापासून दवाखान्यात एडमिट आहे.  
 
 
डॉक्टर रमेश ला बायकोच्या तब्बेतीची विचारपूस करतो 
डॉक्टर: आता तुमच्या बायकोची तब्बेत कशी आहे?
रमेश : बरं वाटतंय तिला आता,
आज सकाळपासून थोडं थोडं भांडायला लागलीय…!
 
बायको : अहो ऐकलंत का, ब-याच दिवसांपासून तुमची इच्छा आहे ना,
आज रात्री मी पूरी करणार आहे..
नवरा : ठीक आहे मी श्रीखंड घेउन येतो.
लागला ना डोक्याला शॉट,
वाचा नीट परत एकदा.
 
मी चित्रपट बघितला आहे 
रमेश ला बायकोवर संशय असतो 
रमेश  – आज मी बायकोला वाचमैन बरोबर
चित्रपट बघायला जाताना पाहिले.
सुरेश  – मग तू मागे नाही गेलास?
रमेश  – नाही रे, तो चित्रपट मी बघितला आहे.
 
एकदा नवरा बायको हातात हात घालून बागेत फिरत असतात.
तिकडून एक खट्याळ मुलगा येतो आणि म्हणतो,
“काका काल वाली जास्तच मस्त होती”.
नवरा आता चार दिवसांपासून उपाशी असून त्या मुलाचा शोध घेत आहे.