सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कविता
Written By सौ. माधुरी अशिरगडे|

जवळिक

जवळिकीने तुझ्या
जाणवू दिले नाही
प्रवाहातील उपरेपण
Shreeya
तुझ्या मनात प्रतिबिंबले
विश्वाचे दर्शन
मनाने उचल घेतली
तुलाच करण्या समर्पण
अननुभूत भावांनी मांडले
जिव्हाळ्याचे निरुपण
परक्या निष्ठांचे
आंतरिकाला वेसण
परवर्तिण्या स्नेहभाव
सज्ज ने‍त्रदर्पण