सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कविता
Written By सौ. माधुरी अशिरगडे|

राज्यकर्त्यांनो

राज्यकर्त्यांनो नका राहू आपल्याच मस्तीत

सत्ताप्राप्तीच्या पोकळ गुर्मीत

कारण येथे केव्हा, कोणती जादू होईल

ते सांगता येत नाही

साखरेची, 'ब्राऊन शुगर' केव्हा होते

याचा पत्ता लागत नाही

मते देणारया हातांच्या कलाचा

दिसून येईल अचानक हातचा मळ

'सर्वधर्मसमभाव' सिंड्रोमच्या भिनलेल्या जुन्या

ज्वरासारख्या, साथीच्या

रोगाच्या नादात

देशाचा भूगोल बदलणार नाही

याची काळजी घ्या

खुर्ची असेल तुमची मजबूत

पण मतभेदाचा एकच ढेकूण तुम्हाला हुसकवण्यास

समर्थ ठरेल

असं न होवो की राजकारण म्हणजे

'सगीतखुर्ची' चा एक खेळ ठरेल