गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कविता
Written By सौ. माधुरी अशिरगडे|

रात्र

माहीत होते मला
हा अंधार जीवघेणा
अशीच सोबत करणार
मिळू पाहाणार्‍या सावलीसारखा
Subtro
कडक इस्त्रीचा देह यानेच
अस्ताव्यस्त चुरगाळला
प्रकाशाची फट शोधत होतं चुकार मन
संपेलच कधी न कधी ही एक रात्र
मुर्दाड आशा आसूसून पहात होती
पण अंधराचं सूचक हास्य
नजरेतून उपहास गाळीत
हेच कुत्सित सत्य
सांगत होतं की
ही एक काळरात्र आहे, अनन्ताचं वरदान
मिळालेली, 'दक्षिण धृवावरील'