गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कविता
Written By सौ. माधुरी अशिरगडे|

सांग आरशा-मी दिसते कशी?

- डॉ. अमला गोडे

माझ्याकडे आहे एक आरसा-
रोज त्याला मी विचारते, सांग आरशा मी दिसते कशी? ।।1।।

आरसा म्हणतो -
''निरागस गोरी गोबरी - बाळसेदार
कानी कुंडल मोतीहार - वाटते जशी बार्बी डॉल'' ।।2।।

सांग आरशा मी दिसते कशी? आरसा म्हणतो -
नजर बावरी - भिरभिरी - चेहऱ्यावर रोज नवी पुटकुळी,
कोणाचा विचार करते गं? अशी कशाला लाजते गं? ।।3।।

ND
सांग आरशा मी दिसेन कशी? आरसा म्हणतो -
''नजर लाजरी गाली लाली - मागे पुढे आरशामध्ये
मुरडून पाहते - कोणाची गं वाट पाहते. '' ।।4।।

सांग आरशा मी दिसेन कशी? आरसा म्हणतो -
''गळ्यात काळी पोत, तुझ्या भांगामध्ये सिंदूर साजे
तुझ्या मागे आरशामध्ये - कोण रोज दिसते गं? '' ।।5।।

सांग आरशा मी दिसते कशी? आरसा म्हणतो -
''कडेवरची छोटी बाळी - गोली गोबरी बाळसेदार
वीसच वर्ष झाली गं-तुलाच पुन: : पाहतो का? '' ।।6।।

पण आजकाल मीच म्हणते -
''आरशा - आरशा - थांब जरा -
माझ्या बळीला मी न्हाऊ घालते दूध देते
माझ्या बाळीचा ला अंगाई गाते
सांगू नको रे - मी दिसते कशी
ऐकण्यापुरताही वेळ नाही
आरशा - आरशा थांब जरा।। 7।।

साभार : महाराष्ट्र साहित्य सभा, इंदूर यांच्या मालविका स्मरणिकेतून