गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कविता
Written By सौ. माधुरी अशिरगडे|

सोयरिक

ND
हे मोकळं माळरान
नेहमीच खुणावतं मला
मग माळरानाचं मोकळेपणही
गळ्यात दाटतं
इकडे जर्जर जीवीत्-बंध
आणिकच शिरजोर बनतात
प्रश्नचिन्हापलीकडचं अजून काहीच झालेलं नसतं
आपण सगळेच
प्रश्नचिन्हाच्या अलीकडचे
मला प्रश्न-चिन्हा पलीकडचं
जग जगायचंय्
ही ओरड शेवटी
नि:शब्द बनून ठरते
अन् माझं क्षितिजाशी असलेलं
अतूट नातं तुटत असतं तेव्हाच....