बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: सोमवार, 23 नोव्हेंबर 2020 (11:16 IST)

हवा हवासा गारवा आला हवेत

हवा हवासा गारवा आला हवेत,
गुलाबी थंडी न घेतलं मज कवेत,
कोवळे ऊन पडे सुखद अंगावरी,
धुक्याची शाल ओढून बसली वनश्री,
पहाट वारा लावी वेड माझ्या जीवास,
करावा वाटतो कुठंतरी लांबवर प्रवास,
जाऊच नये वाटते, हे वातावरण प्रसन्न,
गवसली वाटते मज सुखाची खाण!
आल्यासारखी रहा इथं काही काळ तरी,
खूप करीन गुजगोष्टी, तुजसी ही आस अंतरी!!
....अश्विनी थत्ते.