गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Updated : मंगळवार, 28 सप्टेंबर 2021 (17:26 IST)

येशिल कधी परतून ?

येशिल कधी परतून ?
जिवलगा, येशिल कधी परतून ?
वाट पाहू किती ? कुठे दिसे ना, तुझी एकही खूण
उदास भासे सुंदर पिवळे श्रावणातले ऊन
जिवलगा, येशिल कधी परतून ?
हिरवे सोने हे दसर्‍याचे हाति जाई सुकून
गोड गुपित मम सांगु कुणाला ? गेले बाई भिऊन
जिवलगा, येशिल कधी परतून ?
भाऊबिजेचे हे निरांजन बघते वाट अजून
ये लवकरी ये, भाऊराया, जाऊ नको विसरून !
जिवलगा, येशिल कधी परतून ?
__वि. स. खांडेकर