गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 07
  4. »
  5. रक्षाबंधन
Written By वेबदुनिया|

खोबर्‍याची मावा बर्फी

साहित्य- खवा १ किलो, सुक्या नारळाचा कीस ३०० ग्रॅम, साखर ६०० ग्रॅम, ड्रायफ्रूटसचे तुकडे १०० ग्रॅम, खाण्याचा रंग

NDND
प्रक्रिया- एका जाड कढईत खवा घेऊन तो चांगला हलवून घ्यावा. खवा चांगल्या पद्धतीने गरम झाल्यानंतर गॅस बंद करा. आता दुसर्‍या भांड्यात पाकाची चाचणी करा. पाकाची कडक चाचणी झाल्यानंतर त्यामध्ये खवा, खोबर्‍याचा कीस आणि ड्रायफ्रूटसचे तुकडे टाकून
त्यांना एकत्र करा.

आता ह्या मिश्रणाचे दोन भाग करा. एका भागात रंग मिसळून दुसरा भाग तसाच राहू द्या. तूप लावलेल्या ताटात साधे मिश्रण पसरावे व त्यावर रंगीत मिश्रण पसरवा. गार झाल्यानंतर हवे त्या आकारात कापून घ्या.