शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. »
  3. धर्मयात्रा
  4. »
  5. धर्मयात्रा लेख
Written By भीका शर्मा|

जैन क्षमावाणी पर्व

पर्युषण पर्व समारोपावेळी 'क्षमावाणी पर्व' साजरे केले जाते. या दिवशी जैन समाजबांधव गत वर्षात त्यांच्याकडून कुणी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष दुखावले गेल्यास भगवान महावीरांना शरण जाऊन क्षमा मागतात.      
धर्मयात्रेच्या या भागात आम्ही आपल्याला घेऊन जात आहोत ‍इंदौर येथील जैन मंदिरात. जैन समाजबांधव भाद्रपद महिन्यात पर्युषण पर्व मोठ्या भक्तीभावनेने साजरे करतात. श्वेताम्बर संप्रदायातील पर्युषण पर्व 8 दिवस चालते तर त्यानंतर दिगंबर संप्रदायी 10 दिवसांचे पर्युषण पर्व साजरे करतात. त्याला ते 'दसलक्षण' या नावानेही संबोधतात.

तसे पाहिले तर पर्युषण पर्व दीपावली, ईद अथवा ख्रिसमस या सणांप्रमाणे उत्साह व आनंदाने साजरा केला जाणारा सण नाही. तरी देखील त्याचा प्रभाव संपूर्ण जैन समाजावर दिसून येतो. मध्य प्रदेशातील इंदूर येथील दिगम्बर जैन मंदिरात यंदा मोठ्या भक्तीभावनेने पर्युषण पर्व साजरे झाले. हजारोंच्या संख्येने जैन समाजबांधवांनी भगवान महावीर यांचे दर्शन घेतले.

ND
पर्युषण पर्व साजरे करण्यामागचा मुख्य उद्देश्य म्हणजे आत्मा शुद्ध करण्यासाठी‍ विविध सात्विक उपायांवर ध्यान केंद्रीत करणे होय. पर्युषण पर्वादरम्यान पूजा, अर्चना, आरती, समागम, त्याग, तपस्या, उपवास यात जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा तसेच कौटुंबिक वातावरणातून दूर राहण्याचा प्रयत्‍न केला जातो. संयम व विवेक यांच्यावरच लक्ष केंद्रीत केले जाते.

पर्युषण पर्व समारोपावेळी 'क्षमावाणी पर्व' साजरे केले जाते. या दिवशी जैन समाजबांधव गत वर्षात त्यांच्याकडून कुणी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष दुखावले गेल्यास भगवान महावीरांना शरण जाऊन क्षमा मागतात. जैन धर्मात असे म्हटले जाते की, क्षमा मागणार्‍या पेक्षा क्षमा करणारा श्रेष्ठ असतो.