बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. »
  3. धर्मयात्रा
  4. »
  5. धर्मयात्रा लेख
Written By वेबदुनिया|

दक्षिणेची काशी

PR
ज्या देवस्थानाचे स्वत:चे असे खास वैशिष्ट्य आहे, अशा भारतातील दोन मंदिरांपैकी एक म्हणजे, दक्षिणेतील काशी म्हणून ओळखले जाणारे धर्मस्थळ हे देवस्थान. दुसरे साक्षीगोपाळ मंदिर ओरिसात आहे. गावातील खटल्यांची उकल कोर्टकचेरीऐवजी इथे मंदिर व्यवस्थापना मार्फत केली जाते. दिलेला निवाडा बहुतांशी दोन्ही बाजूंकडून मान्य केला जातो, मग ते लोक कोणत्याही धर्माचे वा जातीचे असतो. धर्मस्थळ, ज्याचा उच्चार धर्मास्थळला असाही केला जातो, ते मंदिर कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात, मंगलोरपासून 55 किलोमीटर अंतरावर आहे. ज्या नदीच्या नावावरून केरळची लोकप्रिय एक्सप्रेस गाडी रोज दिमाखात धावते, त्या नदीकाठी हे मंदिर वसले आहे.

या मंदिराचे आणखीही एक वैशिष्ट्य म्हणजे येथील पुजारी हिंदू असले तरी मंदिराचे व्यवस्थापन मात्र जैन धर्मियांकडे आहे. पूजेअर्चेचे काम माथव वैष्णव कुटुंबीयांपैकी बघतात, तर त्याचे पालकत्व आठशे वषर्शंपासून हेगड्‍धांकडे वंशपरंपरागत चालत आलेले आहे. हे ‍मंदिर म्हणजे सर्व धर्मियांच्या सहिष्णुतेचे एक प्रतीक मानले जाते. सोन्याच्या लिंगातील शंकराची पूजा येथे केली जाते, या स्थळाचे माहात्म्य इतके मोठे आहे, की येथे दररोज दहा हजारांहून अधिक भाविक शंकराच्या दर्शनाला येतात. केरळ राज्यातील देवळांच्या प्रथेप्रमाणे इथेही दुपारी दोन ते साडेसहापर्यंत मंदिराचे दरवाजे बंद असतात. पुरुषांना आत जाण्यापूर्वी शर्ट काढावा लागतो. दर वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरच्या दरम्यान या मंदिरात लक्षदीप महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्यावेळी येते प्रंचड जनसागर लोटतो.

कसे जाल?
धर्मस्थळापासून मंगलोर विमानतळ 55 कि.मी. अंतरावर आहे.
मंगलोर रेल्वेने जोडले आहे. त्यामुळे रेल्वेनेही येऊ शकता.
हसन, चिकमंगलूर, उड्डपी आणि मंगलोर या शहरांना धर्मस्थळ रस्त्याने जोडले आहे.

कुठे राहाल?
थोडेसे पैसे भरून मंदिरातील लॉजमध्ये राहण्याची सोय होऊ शकते.
काही खासगी हॉटेल्समध्येही राहता येऊ शकते.