शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. »
  3. धर्मयात्रा
  4. »
  5. धर्मयात्रा लेख
Written By भीका शर्मा|

धुनीवाले दादाजी

WD
धुनीवाले दादाजी यांची गणना भारतातील महान संतांमध्ये केली जाते. शिर्डीच्या साईबाबांना ज्याप्रमाणे लोक मानतात, तसेच दादाजींच्या बाबतीतही त्यांचे भक्तांचे आहे. दादाजी (स्वामी केशवानंदजी महाराज) हे एक फार मोठे संत होते. देशाटन करता करता धर्मजागृती करणे हे त्यांनी जीवीतकार्य मानले होते. ते रोज पवित्र अग्नीसमोर (धुनी) ध्यानमग्न बसून राहत., म्हणून त्यांना लोक धुनीवाले दादाजी या नावाने ओळखतात.

WD
दादाजींचे चरित्र उपलब्ध नाही. पण त्यांच्याविषयीच्या अनेक कथा प्रचलित आहेत. दादाजींचा दरबार त्यांच्या समाधी स्थळी आहे. देश-परदेशात त्यांचे असंख्य भक्त आहेत. दादाजींच्या नावावर भारत व परदेशात 27 आश्रम आहेत. त्या सगळीकडे अग्निहोत्र अजूनही सुरू आहे. सन 1930 मध्ये दादाजींनी मध्य प्रदेशातील खांडवा शहरात समाधी घेतली होती. ही समाधी रेल्वे स्थानकापासून 3 किलोमीटरवर आहे.

छोटे दादाजी (स्वामी ‍हरिहरानंदजी)

WD
राजस्थानच्या डिडवाना गावातील एका समृद्ध परिवारातील सदस्य भँवरलाल दादाजींना एकदा भेटायला आले होते. भेटीनंतर त्यांनी स्वतः:ला धुनीवाले दादाजींच्या चरणी समर्पित केले. भँवरलाल शांत प्रवृत्तीचे होते आणि दादाजीच्या सेवेत आपला वेळ घालवत होते. दादाजींनी त्यांना आपले शिष्य म्हणून स्वीकारले आणि त्यांचे नाव ‍हरिहरानंद ठेवले.

WD
हरिहरानंदजींना भक्त छोटे दादाजी या नावाने हाक मारू लागले. धुनीवाले दादाजींनी समाधी घेतल्यानंतर हरिहरानंदजींना त्यांचे उत्तराधिकारी मानण्यात आले. हरिहरानंदजींचे आजारपणामुळे सन 1942 मध्ये महानिर्वाण झाले. छोट्या दादाजींची समाधी मोठ्या दादाजींच्या समाधीला लागून आहे.

कसे जायचे :
रेल्वे : खांडवा मध्य आणि पश्चिम रेल्वेचे एक प्रमुख स्थानक आहे व भारताच्या प्रत्येक भागातून येथे पोहचण्यासाठी गाड्या उपलब्ध आहेत.

रस्ता मार्ग : खांडवा इंदूरहून 135 किलोमीटरवर अंतरावर आहे येथे रेल्वे व रस्ता मार्गेद्वारे जाता येते.

हवाई मार्ग : येथून सर्वांत नजीकचे विमानतळ देवी अहिल्या एअरपोर्ट, इंदूर आहे.

फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा...