मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. साहित्य संमेलन २००९
Written By वेबदुनिया|

अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारेन– सारडा

किरण जोशी

अध्यक्षपदाच्या निवड़णूकीत पराभव पत्करलेले शंकर सारडा हे अध्यक्षपदासाठी सरसावले आहेत. अध्यक्षपदासाठी माझ्या नावाचा विचार होण्यास हरकत नाही' असे पत्रकारांना सांगताना त्यांनी या पदासाठी आपण तयार असल्याचे सुचित केले.

डॉ. आनंद यादव यांचे निवडक साहित्य वगळता इतर निकृष्ट दर्जाचे आहे, अशा शब्दात टीका करण्या-या सारडा यांना अनपेक्षितपणे पुन्हा अध्यक्ष होण्याची संधी चालून आल्याने त्यांनी त्याची इच्छा जाहीरपणे बोलूनही दाखवली आहे.

दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या संमेलनाचा अध्यक्ष निवडणूक घेऊन ठरविणे शक्य नाही, त्यामुळे माझ्या नावाचा विचार होण्यास हरकत नाही, असे ते म्हणत आहेत.