मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. साहित्य संमेलन २००९
Written By वेबदुनिया|
Last Modified: महाबळेश्वर , शुक्रवार, 20 मार्च 2009 (08:59 IST)

वारकरी समाधानी:भाषण वाचण्यास हरकत नाही

तर्कतिर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी नगरी

अध्यक्षपदासाठी काथ्याकूट झाल्यानंतर वारक-यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली असून आमचा भूमिकेला विरोध आहे पण, संमेलनामध्ये अध्यक्षांचे भाषण वाचून दाखविण्यास आमचा विरोध नाही, असे मत देहू संस्थानचे अध्यक्ष बापूसाहेब मोरे व्यक्त केले आहे.

ते म्हणाले, वारक-यांची श्रध्दा असणा-या संतांवर कोणीही उठून टिका करायची, असे प्रकार यापुढे होऊ नयेत. डॉ. यादव यांच्या अध्यक्षपदाला आमचा विरोध होता मात्र, संमेलनामध्ये त्यांचे भाषण वाचून दाखविण्यास आमची हरकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.