मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. साहित्य संमेलन २००९
Written By वेबदुनिया|
Last Modified: महाबळेश्वर , शुक्रवार, 20 मार्च 2009 (16:07 IST)

... तर अध्यक्षीय भाषणाचे जाहीर वाचन

रसिक व साहित्यिकांनी पाठ फिरवलेल्या येथील साहित्य संमेलनात कवी अशोक नायगावकर व रामदास फुटाणे यांनी आवर्जून हजेरी लावली आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या डॉ. आनंद यादवांचे अध्यक्षीय भाषण वाचून दाखवावे अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा, आपण मंडपाबाहेर त्याचे सामुदायिक वाचन करू असा इशाराही त्यांनी दिला आहे.

या संमेलनावर साहित्यिकांपेक्षा साहित्य महामंडळाच्या पदाधिकार्‍यांचा वरचष्मा असल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. साहित्यिकांमुळे संमेलनाला प्रतिष्ठा लाभते. त्यामुळे भलेही यादव येथे उपस्थित नसले तरीही तेच अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांचा आदर राखावा आणि त्यांचे भाषण वाचून दाखवावे अशी मागणी या दोन्ही साहित्यिकांनी केली आहे.