मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. साहित्य संमेलन २००९
Written By वेबदुनिया|

नाराज हातकणंगलेकर आल्या पावली परत

- किरण जोशी

PRPR
सांगलीत गेल्या वर्षी भरलेल्या ८१ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म. द. हातकणंगलेकर व मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्यात झालेल्या वादानंतर हातकणंगलेकरांनी साहित्य संमेलनातून नाराज होऊन काढता पाय घेतला. हातकणंगलेकरांना चांगली वागणूकही मिळाली नाही.

डॉ. आनंद यादवांनी राजीनामा दिल्यापासून महाबळेश्वर साहित्य संमेलनाची रयाच गेली आहे. आज साहित्य संमेलन सुरू होऊनही तिथे साहित्य महामंडळाच्या पदाधिकार्‍यांखेरीज कोणीही उपस्थित नाही. अनेक साहित्यिकांना निमंत्रण देऊनही ते आलेले नाहीत. हातकणंगलेकरांना तर निमंत्रण पत्रिकाही दिलेली नाही. तरीही अशा 'निर्नायकी' परिस्थितीतही त्यांनी येथे येण्याचे मान्य केले होते. ग्रंप्रदर्शनाचउद्‌घाटहातकणंगलेकयांच्यहस्तहोणाहोते. मात्र, कार्यक्रस्थळवेळेपोचणानसल्यानत्यांनतशसूचनश्री. ठाले-पाटीयांनदिलहोती. तरीहत्यांचवाट न पाहतश्री. ठाले-पाटीयांनग्रंप्रदर्शनाचउद्‌घाटस्वत: च केले. त्यादरम्यान, श्री. हातकणंगलेकत्यठिकाणपोचले. येथउद्‌घाटनावरूदोघावाझाला. वादामुळसंतप्झालेलश्री. हातकणंगलेकनिघूगेले. हातकणंगलेकरांची यावेळी विचारपूसही करण्यात आली नाही.

माजी संमेलनाध्यक्षांच्या संतापाची परंपरा सांगलीपासून सुरू झाली. सांगली साहित्य संमेलनात नागपूर संमलेनाचे अध्यक्ष अरूण साधू येऊनही समारंभात सहभागी झाले नव्हते. त्यामुळे त्यावेळचे संमेलनाध्यक्ष हातकणंगलेकर यांना महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते अध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारावी लागली होती. यावेळी डॉ. आनंद यादव यांनी संमेलन सुरू होण्यापूर्वीच राजीनामा देऊन टाकला आहे. त्यामुळे संमेलनाला अध्यक्षच नाही. अशा परिस्थितीत माजी अध्यक्ष स्वतःहून हातकणंगलेकर संमेलनाला हजर राहिले असतानाही त्यांना आल्या पावली परत जावे लागले आहे.

संमेलन कुणाचे?
डॉ. यादवांनी संमेलनाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून हे संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कह्यात जाऊन बसले आहे. जणू हे संमेलन फक्त महामंडळाने भरविले असावे असे चित्र आहे. मराठी सारस्वतांनी पाठ फिरवल्याने सर्वत्र पदाधिकार्‍यांचाच काय तो वावर दिसत आहे.