शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: शनिवार, 20 मार्च 2021 (09:00 IST)

काचेच्या आणि प्लास्टिक बाटल्या स्वच्छ करण्यासाठी टिप्स

काचेच्या आणि प्लॅस्टिकच्या बाटल्या स्वच्छ केल्या नाही तर या मध्ये वास येऊ लागतो. आम्ही काही टिप्स सांगत आहोत ज्यामुळे वास नाहीसे होईल. 
 
* बाटली  स्वच्छ करण्यासाठी त्यात पांढरा व्हिनेगर घालून बाटली बंद करून हलवून घ्या. नंतर बाटली ब्रशने स्वच्छ करून कोमट पाण्याने धुवून घ्या. बाटली पूर्णपणे स्वच्छ होईल. 
 
* प्लास्टिकची घाणेरडी बाटली स्वच्छ करण्यासाठी दोन चमचे  व्हिनेगरमध्ये एक चमचा बेकिंग सोडा मिसळा. आता ते व्यवस्थित हलवा आणि नंतर थोडावेळ सोडा. आता बाटली बाहेरून स्वच्छ करण्यासाठी हे द्रव्य ब्रशवर लावून बाटली बाहेरून घासून घ्या.झाकण पण तसेच स्वच्छ करा. नंतर बाटली पाण्याने धुवून घ्या 
 
* बाटली स्वच्छ करण्यासाठी बाटलीत निम्मे पाणी भर. त्यात आईसक्युब घाला.नंतर लिंबाचे तुकडे आणि मीठ घाला आता बाटली चांगल्या प्रकारे हलवून घ्या. पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे बाटलीतले जंत मरतील आणि वास देखील नाहीसा होईल. 
 
*  काचेच्या बाटल्या स्वच्छ करण्यासाठी कोमट पाणी आणि थोडे डिश साबण घाला. यानंतर बाटली चांगल्या प्रकारे हलवा आणि ती स्वच्छ करा . यानंतर ते कोमट पाण्याने धुवून वाळवा. काचेच्या बाटल्या हाताने धुवा, त्यांना ब्रशने स्वच्छ करू नका.
 
* आपण दररोज साबणाच्या पाण्याने देखील बाटल्या स्वच्छ करू शकता. या मुळे घाण वास नाहीसा होईल. जास्त वास येत असेल तर एक चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा ब्लिच पाण्यात मिसळून ते पाणी बाटलीत घालून रात्र भर ठेवा सकाळी पाण्याने स्वच्छ करून कोरडे करा. बाटल्या स्वच्छ होतील.  
 
*उकळत्या पाण्यात प्लास्टिक च्या बाटल्या घालून स्वच्छ करता येतात. या मुळे जिवाणू मरतील आणि वास देखील येणार नाही.