व्हाईट डिस्चार्जचा त्रास होत आहे, तर मग हे करून बघा

Last Modified बुधवार, 7 ऑक्टोबर 2020 (10:00 IST)
प्रत्येक बाईला पांढऱ्या स्त्रावाचा समस्येतून जावं लागतं. ही समस्या किंवा हा त्रास एक अतिशय सामान्य बाब आहे. जर आपण देखील या त्रासाशी झुंजत आहात तर आम्ही इथे आपल्याला काही घरगुती उपाय सांगत आहोत, जे उपाय आपण केल्यानं एका आठवड्यातच आपल्याला या त्रासापासून सुटका मिळू शकते. मुख्य म्हणजे की आपल्याला हे उपाय केल्यानं काहीही दुष्परिणाम होणार नाही.
सरत्या वयात बायकांना अनेक प्रकारच्या समस्या होऊ लागतात. अश्या बऱ्याच समस्या असतात ज्या आपण कोणाला ही सांगू शकत नाही. त्याबद्दल बोलू शकत नाही. ज्याबद्दल बोलल्यावर देखील अस्वस्थता जाणवते. अश्याच काही त्रासांपैकी एक आहे ते म्हणजे ल्युकोरिया. याला पांढरे पाणी, व्हाईट डिस्चार्ज किंवा श्वेत प्रदर देखील म्हणतात. हा त्रास बायकांना मासिक पाळी येण्याचा काही दिवस पूर्वी किंवा पाळी आल्यावर जाणवतो. तसेच काही बायकांना याचा फार त्रास होतो. त्यांना दररोज या समस्येला सामोरी जावं लागतं.

बायकांना होणारा हा आजार प्रामुख्यानं अशक्तपणा, पोषक तत्त्वांची कमतरता झाल्यामुळे होतो. या त्रासापासून वाचण्यासाठी औषध आणि घरगुती उपाय दोन्ही ही प्रभावी आहेत. जर आपण या समस्येेेेला झुंज देत आहात तर या काही घरगुती उपचार केल्यानं आपल्याला एका आठवड्यातच या समस्येपासून मुक्तता होईल. मुख्य म्हणजे या उपचारांमुळे आपल्याला काहीही दुष्परिणाम होणार नाही.

मेथी दाणा :
बायकांना या समस्यांपासून दूर ठेवण्यासाठी मेथीदाणे हा एक प्रभावी मार्ग आहे. यासाठी आपण तीन चमचे मेथी दाणा घ्या आणि त्यांना अर्धा तास अर्ध्या लीटर पाण्यात उकळवून घ्या. नंतर या पाण्याला गाळून घ्या. पाणी थंड झाल्यावर या पाण्याला पिऊन घ्या. दिवसातून किमान दोन वेळा तरी एक एक ग्लास पाणी प्यावं. मेथीदाणा हे मायक्रोफ्लोरा आणि पीएचच्या पातळी राखण्यास मदत करत. याचा दररोज सेवन केल्यानं एका आठवड्यातच आपल्याला या समस्ये पासून आराम मिळू शकतो.
* सकाळी केळी खावे :
फार कमी लोकांना हे माहीत असेल की केळी देखील बायकांच्या आरोग्याशी निगडित या समस्येला संपविण्यासाठी प्रभावी आहेत. बायकांनी दररोज सकाळी पिकलेलं केळ खावं. जर आपण केळीला साजूक तूप लावून खाल्ल्यानं आपणास त्वरित आराम मिळेल. याच बरोबर आपण केळीला साखर किंवा गुळा बरोबर देखील खाऊ शकता. याचे सेवन केल्यानं हानिकारक सूक्ष्म जंत शरीरातून बाहेर पडतील आणि आपल्याला या समस्येतून आराम मिळेल.
* धणे :
धणे हे देखील आपल्याला पांढऱ्या पाण्याच्या त्रासापासून सुटका मिळवून देऊ शकतात. यासाठी बायकांनी 100 ग्रॅम धणे रात्रभर 100 मि.ली. पाण्यात भिजवून ठेवावं. सकाळी हे पाणी गाळून पिऊन घ्या. असे केल्यानं विषारी पदार्थ बाहेर पडतात. दररोज असं करावं, एका आठवड्यात आपल्याला आराम मिळेल.

* आवळ्याची आणि मधाची पेस्ट देखील फायदेशीर आहे :
आवळा तर नेहमीच आरोग्यासाठी फायदेशीर असतो. बायकांना ल्युकोरियाच्या त्रासापासून मुक्त करण्यासाठी आवळा आणि मध हे प्रभावी आहे. या साठी दोन चमचे आवळ्याची भुकटी किंवा पूड घ्या आणि त्यामध्ये मध मिसळून घट्ट पेस्ट बनवा. या पेस्टला दिवसातून दोन वेळा खा. या व्यतिरिक्त आवळ्याचं सेवन पाण्यात उकळवून देखील करू शकता. पाण्यात हे टाकून पिण्याची पद्धत म्हणजे आपण एक कप पाण्यात एक चमचा आवळ्याची पूड किंवा भुकटी घालून त्या अर्ध कप होई पर्यंत उकळवून घ्या. आपणास हे चवीला कडवट लागत असल्यास या मध्ये आपण मध किंवा पुन्हा पाणी मिसळू शकता. दररोज हे प्यायल्यानं फायदा होणार.
* जांभळाची साल :
या समस्येतून सुटका मिळविण्यासाठी जांभळाची साल देखील एक प्रभावी उपाय आहे. या साठी आपण फक्त जांभळाच्या सालीची भुकटी बनवा. हे आपण दिवसातून 2 ते 3 वेळा पाण्यासह दोन चमचे खावं. असं केल्यानं आपणांस एका आठवड्यातच आराम मिळेल.


यावर अधिक वाचा :

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...
आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्याच झालेला सामना CSKने 10 धावांनी ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून
तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम केला
नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाच्या शौर्य योद्धांना 88व्या भारतीय ...

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या
सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला ...

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल
दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली ...

अल्झायमरः सीमा देव यांना झालेला अल्झायमर हा आजार आहे तरी ...

अल्झायमरः सीमा देव यांना झालेला अल्झायमर हा आजार आहे तरी काय?
पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये तर 40-50 वर्षांच्या लोकांमध्येही हे आजार दिसू लागले आहेत. ...

रिफ्रेश योगा करा, निरोगी आणि तंदुरुस्त रहा

रिफ्रेश योगा करा, निरोगी आणि तंदुरुस्त रहा
सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घरातूनच ऑफिस काम सुरू आहेत. घरात राहून हात पाय आखडतात. ...

सरकारी नौकरी करण्याची सुवर्ण संधी

सरकारी नौकरी करण्याची सुवर्ण संधी
जगभरात सरकारने बऱ्याच संस्थेसाठी रिक्त पद काढल्या आहेत. इच्छुक उमेदवार आपल्या ...

नवरात्रासाठी मेकअप टिप्स : घरातच ट्राय करा 'न्यूड मेकअप'

नवरात्रासाठी मेकअप टिप्स : घरातच ट्राय करा 'न्यूड मेकअप'
मेकअप तर सर्वच करतात पण सध्याच्या काळात 'न्यूड मेकअप' करण्याची पद्दत जोरात सुरु आहे. ...

'मूर्ख कासव'

'मूर्ख कासव'
एका तलावात गोट्या नावाचा एक कासव राहत असतो. त्याची मैत्री त्या तलावाच्या जवळ राहणाऱ्या ...