बनवा बनाना कप केक

banana cup cake
Last Modified गुरूवार, 24 सप्टेंबर 2020 (12:54 IST)
जास्त पिकलेली केळी खायला नको वाटते. मग ही केळी कचर्यांच्या डब्यात जातात. पण आता पिकलेली केळी फेकून द्यायची गरज नाही. याच केळ्यांपासून मस्तपैकी बनाना कप केक तयार करता येईल.

साहित्य : दोन पिकलेली केळी, एक कप रवा, दोन चमचे दही, दोन चमचे तेल, अर्धा कप साखर, एक छोटा चमचा बेकिंग सोडा, अर्धा चमचा वेलची पूड, थोडे टूटीफ्रूटी.

कृती : पिकलेल्या केळ्यांची सालं काढून केळी नीट कुस्करून घ्या. दुसर्याट भांड्यात रवा घेऊन त्यात दही घाला. (रव्याऐवजी मैदा किंवा गव्हाचे पीठही वापरता येईल.) रवा आणि दह्याच्या मिश्रणात तेल घाला. मग साखर घाला. केळीही गोड असतात. त्यामुळे साखर चवीनुसार घाला. या मिश्रणात वेलची पूड घाला. मग पाणी घालून मिश्रण फेटून घ्या. शेवटी यात कुस्करलेली केळी घालून मिसळून घ्या. सजावटीसाठी वरून टुटीफ्रूटी घाला. हे मिश्रण 15 मिनिटे बाजूला ठेवून द्या. आता यात बेकिंग सोडा घाला. जाड बुडाच्या कढईत मीठ घालून पसरवून घ्या. कढई गॅसवर ठेवा. मीठ गरम करून घ्या. यावेळी कढईवर झाकण ठेवा. पॅन केकच्या साच्याला थोडे तेल लावून घ्या. मग केकचे मिश्रण त्यात घाला. कप केकचे साचे नसल्यास वाट्यांचा वापर करता येईल. कढईमध्ये ताटली ठेवा. त्यावर केकचे साचे किंवा वाट्या ठेवा. वरून झाका. साधारण 25 ते 30 मिनिटे मंद आचेवर शिजूद्या. चमचा किंवा सुरीने केक तयार झाल्याची खात्री करून घ्या. केक थंड होऊ द्या. कुटुंबासोबत बसून या केकचा आस्वाद घ्या.
मधुरा


यावर अधिक वाचा :

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...
आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्याच झालेला सामना CSKने 10 धावांनी ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून
तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम केला
नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाच्या शौर्य योद्धांना 88व्या भारतीय ...

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या
सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला ...

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल
दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली ...

Benefit Of Cauliflower : फुलकोबीचे 10 आरोग्यदायी फायदे

Benefit Of Cauliflower : फुलकोबीचे 10 आरोग्यदायी फायदे
फुलकोबी ही सामान्यतः उपलब्ध होणारी भाजी आहे, याचा वापर फक्त भाजी बनविण्यासाठीच नव्हे तर ...

Kids Story पैशाचं झाड

Kids Story पैशाचं झाड
ही गोष्ट आहे बबलू ची जो कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लागलेल्या लॉक डाऊन मुळे कंटाळला होता. ...

मुलांसाठी खास बेत चविष्ट गार्लिक पोटेटो

मुलांसाठी खास बेत चविष्ट गार्लिक पोटेटो
मुलांना नेहमीच काही तरी चमचमीत नवीन पदार्थ खावासा वाटतो. दररोज चे काय करावे हा एक मोठा ...

ही 11 लक्षणे आढळल्यास किडनी निकामी होण्याची लक्षणे असू

ही 11 लक्षणे आढळल्यास किडनी निकामी होण्याची लक्षणे असू शकतात
शरीरातील कोणत्याही समस्येकडे दुर्लक्षित करू नये कारण कदाचित ही समस्या एखाद्या आजाराचे ...

लिपिक पदाच्या 2500 पेक्षा अधिक जागा, 6 नोव्हेंबर पर्यंत ...

लिपिक पदाच्या 2500 पेक्षा अधिक जागा, 6 नोव्हेंबर पर्यंत त्वरा अर्ज करा
आयबीपीएस लिपिक 2020 : जर आपण बँकेत नोकरी करण्याची इच्छा बाळगता आणि त्यासाठीच्या नोकरीचा ...