सोमवार, 15 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Modified: शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (21:43 IST)

Dussehra special Recipe : दसरा स्पेशल केसर जलेबी घरीच बनवा,रेसिपी जाणून घ्या

दसरा, दिवाळी आली की काही तरी गोडधोड बनणारच. यंदाच्या दसऱ्याला केसर जिलेबी बनवा.जिलेबी असा प्रकार आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानाच आवडते. सणासुदीत  किंवा इतर विशेष प्रसंगी प्रत्येक घरात जिलेबी बनवतात.यंदाच्या दसऱ्याला जिलेबी बनवा साहित्य आणि कृती जाणून घ्या. 
 
साहित्य -
1/2 कप मैदा, 1/4 कप दही, साजूक तूप , जिलेबी करण्यासाठी छिद्राचा कापड किंवा लहान बाटली, 1 कप साखर, 1 कप पाणी, 1/2 टी स्पून केसर, वेलची पूड 
 
कृती- 
सर्वप्रथम मैदा आणि दही एकत्र करून घट्ट पीठ तयार करा.गरज असल्यास,  त्यात पाणी देखील घालू शकता.साधारण सहा ते सात तास पीठ खमीर येण्यासाठी  ठेवा. पीठ फुगून वरच्या बाजूला आल्यास, जिलेबीसाठी पाक तयार करा.मंद आचेवर पाणी, साखर,वेलचीपूड  आणि केशर मिसळून पाक बनवा. पाक घट्ट होऊ द्या.पाकेतून तार सुटू लागल्यावर ते काढून थोडे थंड होऊ द्या.
 
 एक खोलगट पॅन घ्या. त्यात साजूक तूप टाकून गरम करा. तयार पीठ पिशवीत किंवा लहान छिद्राच्या बाटलीत घाला. छिद्रा जेवढे लहान असेल तेवढी पातळ जिलेबी बनते. आता गरम तुपात जलेबी टाका. मध्यम आचेवर तळून घ्या .जिलेबी दोन्ही बाजूंनी हलकी तपकिरी रंगाची झाली की बाहेर काढा. पाकात टाका.सुमारे एक मिनिट पाकात पडूद्या. पाकातून जिलेबी बाहेर काढून सर्व्ह करा.
 
Edited By- Priya Dixit