1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By

Malpua Recipe मालपुआ

Malpua Recipe
होळीचा सण जवळच आला आहे .घरोघरी काही गोडधोड बनविले जाते. घरात गुझिया तर बनतेच. परंतु होळीला उत्तर भारतात आणि काही घरात मालपुआ बनवतात. चला तर साहित्य आणि कृती जाणून घ्या. 
साहित्य- 
एक कप मैदा,एक चमचा बारीक शोप,वेलची पूड, नारळाचा किस,अर्धा कप साखर, दूध,तेल किंवा तूप तळण्यासाठी. 
 
कृती- 
दुधात साखर मिसळून ठेवा. एका भांड्यात मैदा चाळून त्यामध्ये शोप, वेलचीपूड,नारळाचा किस मिसळा. दूध साखरेच्या मिश्रणाने कणिक मळून घ्या. लक्षात ठेवा की ही पेस्ट जास्त पातळ किंवा घट्ट नसावी. आता एका कढईत तेल किंवा तूप तापत ठेऊन या पेस्टचे पुरीचे आकाराचे घालून मंद आचेवर सोनेरी रंग येई पर्यंत दोन्ही बाजूने तळून घ्या.मालपुआ खाण्यासाठी तयार. आपण हे साखरेच्या पाकात घालून देखील खाऊ शकता. या साठी आपल्याला एक तारी साखरेचा पाक करायचा आहे.