सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Modified: गुरूवार, 14 जानेवारी 2021 (12:39 IST)

झटकन तयार होणारे पौष्टिक दुधीचे लाडू

कोवळा दुधी धुवून साल काढून घ्या. दुधी किसून घ्या पण आतील पांढरा भाग काढून घ्या. नॉनस्टीक पॅनमध्ये किस साखर मिसळून मंद आचेवर शिजायला ठेवा. मधून मधून हालवत रहा. साखर विरघळ्यावर पाच मिनिट झाकून ठेवा. आता त्यात वेलचीपूड घाला व पाक आटेपर्यत हालवत रहा. मिश्रणाचा ओलावा निघून गोळा व्हायला लागला तेव्हा गॅस बंद करा. आता यात डेडिकेटेड कोकोनट घालून एकत्र करा. सहन होईल इतक गरम असल्यासवर लाडू वळून घ्या. त्यावर आवडीप्रमाणे मेवे लावा. पटकन तयार होणारे लाडवाची पौष्टिक आणि स्वादिष्ट डिश सर्व्ह करा.