शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By

कच्च्या पपईचा शिरा

साहित्य : 4 वाट्या कच्च्या पपईचा कीस, 1 वाटी कीसाला 1/2 वाटी साखर, 1 चमचा लिंबाचा रस, काजू, कीसमीस, बदाम, चेरी, तूप 2 चमचे. 
 
कृती : कच्ची पपई बिया व साल काढून किसावी. हा कीस जाड बुडाच्या कढईत गॅसवर खमंग भाजावा. त्यात लिंबाचा रस टाकावा व साखर टाकून मिश्रण घट्ट शिर्‍याप्रमाणे आटवावे. शिर्‍याप्रमाणे घट्ट झाले की, भांड्यात काढून वरून खोबर्‍याचा कीस, चेरी, काजू, किसमीस, बदामाचे काप टाकून सजवावे. वेलची पूड चवीला टाकावी. हा शिरा चवीष्ट व पाचक असून साखर कमी लागते.