1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गोडधोड
Written By वेबदुनिया|

पिस्त्याची बर्फी

WD
साहित्य : दोन वाट्या पिस्ते, दीड वाटी साखर, अर्धी वाटी खवा.

कृती : पिस्ते भिजत घालून, ते सोलून व वाळवून त्यांची पूड करावी. खवा थोडा भाजून घ्यावा. एका पातेल्यात साखर घालून, साखरेचा
एकतारी पाक करून घ्यावा व त्यात पिस्त्याची पूड घालून थोडे शिजवावे. साधारण घट्ट गोळा झाला, की खाली उतरवून त्यात भाजलेला
खवा घालावा व चांगले घोटावे व जायफळाची पूड घालावी. नंतर पोळपाटाला तुपाचा हात लावून, त्यावर तो गोळा पातळ लाटून, वड्या
कापाव्यात. त्या वड्यांवर चांदीचा वर्खही लावतात.