1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गोडधोड
Written By वेबदुनिया|

लाल भोपळ्याच्या वड्या

ND
साहित्य : दोन वाट्या लाल भोपळ्याचा कीस, दोन वाट्या साखर, पाऊण वाटी मावा, पाव वाटी तूप, दहा-बारा वेलदोडे, पिस्ते.
कृती : भोपळ्याचा कीस तुपावर वाफवून घ्यावा व नंतर तो कीस व साखर एकत्र शिजत ठेवावे. शिजत आल्यावर त्यात मावा घालून पुन्हा शिजवावे. गोळा घट्ट झाल्यावर त्यात वेलदोड्यांची पूड घालावी व ताटाला तुपाचा हात लावून त्यावर तो गोळा लाटावा. त्यावर हवे असल्यास पिस्त्याचे काप घालावेत व वड्या कापाव्यात.