1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गोडधोड
Written By वेबदुनिया|

संत्री रसातील गोड भात

- स्मिता

ND
साहित्य : 4 वाटी शिजवलेला मोकळा भात , साखर दीड वाटी, संत्र्याचा रस दीड वाटी, केशरी रंग पाव चमचा, केशर काड्या 4-5, काजू बादामाचे काप पाव वाटी, विलायची पूड, किसमीस पाव वाटी.

कृती : प्रथम गंजामध्ये साखर, पाणी व संत्र्याचा रस उकळायला ठेवा. साखर विरघळेपर्यंत हलवा. गोळीबंद पाक होऊ द्या, पाकामध्ये केशरी रंग, केशर काड्या, काजू, किसमीस, 1 बदामाचे काप घाला, विलायची पूड घाला व शिजवलेला भात घाला त्याला परता, मंद आचेवर पाक घट्ट होईपर्यंत भात शिजवून घ्या. संत्र्याच्या फोडी लावून सजवा खट्टा मिठा राईस तयार होईल.