बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: गुरूवार, 18 मार्च 2021 (18:30 IST)

होळी विशेष खाद्य पदार्थ खुसखुशीत आलू कचोरी

होळीचा सण आणि घरात कचोरी बनणार नाही हे शक्यच नाही. या सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी घरात आलूची खमंग आणि खुसखुशीत कचोरी बनवू या.चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या. 
साहित्य - 
3 कप बारीक रवा, 1 कप मैदा,2 मोठे चमचे तेल,चिमूटभर खाण्याचा पिवळा रंग, दूध गरजेपुरते,मीठ चवीप्रमाणे,तळण्यासाठी तेल.
 
सारणाचे साहित्य -
250 ग्रॅम बटाटे उकडून मॅश केलेले, 2 चमचे बारीक केली शोप, तिखट, आमसूलपूड,चाट मसाला,आलं किसलेले, मीठ चवीपुरती.
 
कृती- 
सर्वप्रथम रवा आणि मैदा चाळून घ्या त्यात मीठ,खाण्याचा रंग, मिसळून दूध घालून कठ्ठ कणिक मळून घ्या.
सारणासाठी बटाट्यात सर्व मसाले मिसळून मळून घ्या.
कणकेच्या छोट्या-छोट्या गोळ्या करून पुरी सारख्या लाटून घ्या आणि त्या पुरींमध्ये बटाट्याचे सारण भरून कचोरी तयार करून घ्या.
कढईत तेल तापत ठेवा आणि तापल्यावर तयार केलेल्या कचोऱ्या तेलात सोडा आणि सोनेरी रंग येई पर्यंत तळून घ्या. गरम गरम कचोरी हिरव्या चटणी आणि गोड चटणीसह सर्व्ह करा.