1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
  4. Main dishes traditionally prepared for Nrusimha Jayanti

Narasimha Jayanti Naivedya Recipes नृसिंह जयंतीला आवर्जून केले जाणारे सात्त्विक पदार्थ

भगवान नृसिंह हे विष्णूचा अत्यंत उग्र पण भक्ताभिमानी अवतार मानले जातात. त्यांच्या पूजेमध्ये विशेषतः थंडावा देणारे आणि सात्त्विक पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात. नृसिंह जयंतीसाठी परंपरेनुसार कोणते नैवेद्य मुख्य मानले आज आपण जाणून घेणार आहोत. 

पाणाक 
हे दक्षिण भारतात आणि अनेक ठिकाणी नृसिंह जयंतीला आवर्जून केले जाणारे मुख्य पेय आहे. हे अत्यंत थंडावा देणारे असते.
साहित्य-
गुळ (पाऊण वाटी)
पाणी (१ लिटर)
सुंठ पावडर (अर्धा चमचा)
मिरी पूड (पाव चमचा)
वेलची पूड (चवीनुसार)
तुळशीची पाने

कृती-
१. पाण्यात गुळ पूर्णपणे विरघळवून घ्या.
२. त्यात सुंठ, मिरी आणि वेलची पूड घालून व्यवस्थित ढवळा.
३. गाळून घेऊन त्यात तुळशीची पाने टाका. हा 'पाणाक' नैवेद्य म्हणून अर्पण करा.

थंड ताक
साहित्य-
ताजे दही (१ कप)
पाणी (२ कप)
जिरे पूड, आले-मिरची पेस्ट
सैंधव मीठ किंवा साधे मीठ
बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती-
१. दही फेटून त्यात पाणी मिसळा.
२. त्यात आले-मिरचीची पेस्ट, जिरे पूड आणि मीठ घाला.
३. वरून कोथिंबीर घालून थंडगार नैवेद्य तयार करा.

गुळाची लापशी किंवा शिरा
साहित्य-
जाड रवा किंवा गव्हाचा रवा (१ वाटी)
गुळ (१ वाटी)
तूप (अर्धी वाटी)
ड्राय फ्रूट्स आणि वेलची पूड

कृत-
१. तुपात रवा खमंग भाजून घ्या.
२. दुसऱ्या बाजूला गुळाचे पाणी गरम करून घ्या.
३. भाजलेल्या रव्यात गरम गुळाचे पाणी घालून वाफ काढा.
४. वेलची पूड आणि ड्राय फ्रूट्स घालून गरमागरम नैवेद्य अर्पण करा.

दही-भात 
उन्हाळ्याचे दिवस असल्याने देवाला थंडावा मिळावा म्हणून दही-भाताचा नैवेद्य अत्यंत प्रिय मानला जातो. साध्या भातात दही, थोडे मीठ आणि जिरे-कढीपत्त्याची फोडणी देऊन हा नैवेद्य तयार होतो.
महत्त्वाची टीप: 

भगवान नृसिंहाच्या कोणत्याही नैवेद्यात तुळशीचे पान ठेवणे विसरू नका, कारण त्याशिवाय विष्णूचा नैवेद्य पूर्ण मानला जात नाही.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik

About Writer
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... आणखी वाचा
पुढील लेख
Mother's day speech for students मदर्स डे भाषण