सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 डिसेंबर 2021 (11:29 IST)

झटपट तयार करा चॉकलेट पॉपकॉर्न​​​​​​​

साहित्य - पॉपकॉर्न - 1 वाटी, डार्क चॉकलेट - 1/2 कप, व्हाइट चॉकलेट - 1/2 कप (ऐच्छिक).
 
कृती- डबल बॉयलरमध्ये डॉर्क आणि व्हाईट चॉकलेट स्वतंत्रपणे वितळवा. ते चांगले वितळले की त्यांना थोडे थंड होऊ द्या. आता पॉपकॉर्नवर चॉकलेट ओता आणि नीट ढवळून घ्या जेणेकरून चॉकलेटचं त्यावर पूर्णपणे कोटिंग होईल. दहा मिनिटे थंड होऊ द्या. वर चॉकलेट पावडर शिंपडा. काही वितळलेले डॉर्क आणि व्हाईट चॉकलेट टॉपवर स्प्रिंक करा. काही मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. काही वेळाने फ्रीजमधून बाहेर काढा आणि मुलांना चॉकलेट पॉपकॉर्न सर्व्ह करा.