साहित्य : एका नारळाचा चव, थोडे ताक, चमचाभर बेसन, अर्धा चमचा धने, 1 चमचा जिरे, 4 मिरे, 4 सुक्या मिरच्या, कोथिंबीर.
कृती : खोबऱ्याचे दूध काढून त्यात थोडे ताक घालावे. त्याला बेसन लावावे. धने, जिरे व मिरे वाटून त्यात घालावे. एक उकळी आणावी. नंतर सुक्या मिरच्या घालून तुपाची फोडणी त्यात घालावी. खाली उतरवून त्यात चवीप्रमाणे मीठ, साखर, तसेच कोथिंबीर चिरून घालावी.