कृती: ब्रेडच्या कडा काढून वाटीने गोल आकाराच्या चकल्या (पीसेस) करणे, एका पीसवर गोड दही लावावे. त्यावर हिरवी चटणी (मिरच्या कोथिंबीर लसूण जिरे वाटून) लावावी. चटणीवर उकडलेले बटाटे बारीक करून लावावे. त्यावर चिंचेचे गूळ टाकलेली चटणी लावावी. त्यावर पून: एक ब्रेडचा गोल पीस ठेवावा. त्यावर बारीक शेव पसरावी. टमाटा, कांदा, कोथिंबीर बारीक चिरून पसरावी. ही तयार केलेली दाबेली टोमॅटो सॉसबरोबर खाण्यास द्यावी. हिरव्या चटणीस-हिरवी, कोथिंबीर, जिरे, लसूण, तिखट, मीठ, थोडी साखर टाकावी.