1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. शाकाहारी
Written By वेबदुनिया|

मसाला पुरी

- स्मिता

ND
साहित्य : दोन वाट्या कणीक, पाव वाटी बेसन, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा ओवा, 1 चमचा तीळ, वाळलेला पुदिना, कोथिंबीर दीड चमचा, हळद, तिखट, मीठ अंदाजे, लोणच्याचा मसाला लहान दीड चमचा, तळण्यासाठी तेल.

कृती : कणीक व बेसन एकत्र करा, तिखट, मीठ, हळद अंदाजे घाला, जिरेपूड, ओवा, तीळ, पुदिना व कोथिंबिरीची बारीक वाळलेली पूड व लोणच्याचा मसाला घाला, ताक किंवा दही घालून भिजवा. पंधरा मिनिटे भिजू द्या. चांगले मळून छोट्या छोट्या आकारात गोळ्या बनवून पुऱ्या लाटा, गरम तेलावर पुऱ्या लालसर रंगावर तळून घ्या.
खमंग पुऱ्या दोन तीन दिवस खाता येतील. गोड लोण्याबरोबर किंवा सॉससोबत पुरी छान वाटेल.