रविवार, 26 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. मुंबईतली काळरात्र
Written By भाषा|
Last Modified: मुंबई , सोमवार, 3 मे 2010 (12:57 IST)

अकरा पोलिस अधिकारी शहीद

काल रात्री मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर परिस्थिती चिंताजनक असून यावेळी झालेल्या चकमकीत तीन वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍यांसह 11 पोलिस अधिकारी शही‍द झाले असून 80 जण ठार झाले आहेत.

हे दहशतवादी ताज आणि ट्रीडेंड हॉटेल्समध्ये घुसून बसले आहेत. या कारवाईसाठ‍ी केंद्र सरकारने एनसीजीचे 200 कमांडो मुंबईला पाठविले. मुख्यंमत्री देशमुख यांनी संपूर्ण परिस्थितीची माहिती पंतप्रधान आणि सोनिया गांधी यांना दिली.

कामा हॉस्पिटल दहशतवाद्यांच्या ताब्यात नसल्याचे देशमुख यांनी सांगितले. या संयुक्त कारवाईत लष्कराच्या पाच तुकड्या आणि नौसेनेच्या दोन तुकड्यांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.