शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. मुंबईतली काळरात्र
Written By वेबदुनिया|

अखेर शिवराज पाटलांची खुर्ची गेली

PTI
सातत्‍यपूर्ण अपयशामुळे केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी अखेर राजीनामा दिला आहे. देशभरात गेल्‍या अनेक दिवसांपासून होत असलेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यांमुळे गृहमंत्रालय सपशेल अपयशी ठरत असल्‍याचा आरोप वारंवार केला जात होता. त्‍या पार्श्‍वभूमीवर शिवराज यांच्‍या राजीनाम्याचीही मागणी केली जात होती.

शनिवारी कॉंग्रेस कार्यकारी समितीच्‍या बैठकीतही शिवराज यांच्‍यावर पक्षाच्‍या सदस्‍यांकडूनच टीका झाली होती त्‍यावेळी शिवराज यांनी 'आय वील टेक रिस्‍पॉन्सिबलीटी' अशा शब्‍दात राजीनामा देण्‍याचे संकेत दिले होते. तर मुंबईत चाललेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यावरील कारवाई दरम्‍यान पंतप्रधानांनी शिवराज यांना दूर सारून गृहराज्‍यमंत्री श्रीप्रकाश जयस्‍वाल यांना पुढे केले होते. यावेळच्‍या बैठकांनाही शिवराज यांना बोलावण्‍यात आलेले नव्‍हते.

ताजमध्‍ये सुरू असलेल्‍या कमांडो ऑपरेशनच्‍या वेळी शिवराज यांनी माध्‍यमांसमोर या कारवाईची गुप्‍त माहितीही सरळ उघड केल्‍याने सेनादलासह सुरक्षा यंत्रणांनी नाराजी व्‍यक्‍त केली होती. त्‍यामुळे कमांडो कारवाईत अडचणीही आल्‍या होत्‍या. त्‍यामुळे शिवराज यांचा राजीनामा घेतला गेल्‍याची माहिती समोर आली आहे.

आता राजीनामे देऊन काय?