शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. मुंबईतली काळरात्र
Written By वेबदुनिया|
Last Modified: मुंबई , सोमवार, 3 मे 2010 (16:05 IST)

पत्रकार सबिना सैकिया यांचा मृत्यू

दहशतवादी हल्ल्यादरम्यान ताजमहल हॉटेलच्या सहाव्या मजल्यावर अडकलेल्या टाइम्स ऑफ इंडियाच्या वरिष्ठ पत्रकार सबिना सैकिया ठार झाल्या असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

बुधवारी रात्री सबिना ताजच्या सहाव्या मजल्यावर अडकलेल्या होत्या. रात्री उशीरापर्यंत त्या आपल्या कुटुंबियांशी संपर्क साधत होत्या. नंतर मात्र त्यांचा संपर्क तुटला होता.

ज्या मजल्यावर सबिना अडकल्या होत्या, त्यालाच आग लागल्याने त्या ठार झाल्या. सबिना एका लग्नसमारंभासाठी ताज हॉटेलमध्ये गेल्या होत्या.