बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. मुंबईतली काळरात्र
Written By वेबदुनिया|
Last Modified: वॉशिंग्टन , सोमवार, 3 मे 2010 (16:19 IST)

मुंबई हल्ल्याप्रकरणी एफबीआय मदत करणार

दक्षिण मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासासाठी अमेरिकेची गुप्तचर संस्था एफबीआय मदत करणार असून त्यांचे एक पथक भारतात दाखल झाले आहे.

मुंबईतील घडामोडींवर एफबीआय सातत्याने लक्ष ठेऊन असल्याचे एफबीआयचे प्रवक्ते रिचर्ड कोल्को यांनी सांगितले. अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी मुंबई हल्ल्याचा तीव्र निषेध करून भारताला तपासात संपूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.

त्याचा परिणाम म्हणून, एफबीआयचे एक पथक मुंबईत दाखल झाले असून लवकरच दुसरे पथक भारतात येणार आहे.