Last Modified: मुंबई , सोमवार, 3 मे 2010 (16:08 IST)
मुख्यमंत्री विलासरावांचे आश्वासन सत्र
बुधवारी रात्री दक्षिण मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या नातेवाईकांना घरे बांधून देण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ताज ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतर सुरक्षितता महत्त्वाची असेल असे सांगत विलासरावांनी मृतांच्या आणि जखमींच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले.
नॅशनल सेक्यूरीटी गार्डप्रमाणे (एनएसजी) राज्याच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र सुरक्षा गार्ड (एमएसजी) असे विशेष दल स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या हल्ल्यात शहीद झालेल्यांना पंचवीस लाख रूपये आर्थिक मदत आणि या सर्वांनाच मरणोत्तर त्यांच्या निवृत्तीच्या वयापर्यंत पगार दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच, प्रत्येकांच्या नातेवाईकांना घरे आणि कुटूंबातील एकाला सरकारी नोकरी देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.