बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. मुंबईतली काळरात्र
Written By वेबदुनिया|
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 3 मे 2010 (16:19 IST)

मेट्रो सिटीत एनएसजी दल स्थापणार

मुंबईतील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह देशातील चार महानगरांमध्ये नॅशनल सेक्यूरीटी गार्डचे (एनएसजी) दल स्थापन करण्याचा निर्णय पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत घेतला.

तसेच, समुद्री आणि हवाई मार्गाच्या सुरक्षेतही वाढ करण्यात येणार आहे. तर दहशतवादी कारवायांच्या तपासासाठी सेंट्रल फेडरल एजन्सीही स्थापन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. विशेष केंद्रीय संस्था स्थापण्याचाही विचार सुरू आहे.