शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. मुंबईतली काळरात्र
Written By वेबदुनिया|

हल्‍ल्‍यानंतर पंतप्रधानांच्‍या टीममध्‍ये फेरबदल?

दहशतवाद्यांनी मुंबईत 60 तास धुडगूस घातल्‍यानंतर जगभर देशाची झालेली नाचक्की आणि सुरक्षा यंत्रणेवर उठलेले प्रश्‍न यामुळे जेरीस आलेल्‍या पंतप्रधानांना आता जवळपास सर्वच मंत्रालयांमध्‍ये मोठे फेरबदल करावे लागणार असून गृहमंत्री शिवराज पाटील यांच्‍या राजीनाम्यानंतर आणि पी.चिदंबरम हे नवीन गृहमंत्री नियुक्‍तीनंतर आणखीही काही मंत्री व गृहसचिवालय, सुरक्षा यंत्रणा व पोलीस दलातील अधिकारी स्‍तरावर फेरबदल होण्‍याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

रविवारच्‍या सकाळपासूनच या नाट्यमय घडामोडींना वेग आला असून त्‍याअंतर्गत गृहमंत्र्यांचा राजीनामा. तत्‍काळ नवीन गृहमंत्र्यांची नियुक्‍ती आणि माजी राष्‍ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रिजेश मिश्रा यांची पंतप्रधानांशी झालेल्‍या भेटीनंतर त्‍यांची पुन्‍हा या पदावर नियुक्‍ती होण्‍याची शक्‍यता आहे. यामुळे एम.के.नारायणन यांची हकालपट्टी होण्‍याची शक्‍यता निर्माण झाली आहे. गृह सचिव गुप्‍तचर यंत्रणांच्‍या अधिका-यांच्‍या बदल्‍या यावरही आता गाज पडण्‍याची शक्‍यता आहे.