शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. मुंबईतली काळरात्र
Written By वेबदुनिया|
Last Modified: मुंबई , सोमवार, 3 मे 2010 (16:04 IST)

करकरे कुटुंबियांचा मोदींच्या मदतीस नकार

शहीद महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख हेमंत करकरे यांच्या निधनानंतर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली एक कोटीची आर्थिक मदत करकरे कुटूंबियांनी नाकारली असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजले.

करकरे कुटुंबियांच्या निवासस्थानी मोदींनी काल जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर एन्कॉऊंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर यांच्या कुटुंबियांचीही त्यांनी भेट घेतली.

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात अतिरेक्‍यांशी लढा देताना 14 पोलिस अधिकारी आणि कर्मचारी शहीद झाले आहेत. त्यांच्या कुटुंबियांना गुजरात सरकार प्रत्येकी एक कोटी रुपये मदत देईल, अशी घोषणा मोदी यांनी केली होती.