शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. मुंबईतली काळरात्र
Written By भाषा|
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 3 मे 2010 (16:16 IST)

तीन दिवसात किमान तिनशे वेळा रडलीः लतादीदी

IFM
मुंबईवर झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यांनी स्वरसाम्रज्ञी लता मंगेशकर यांना प्रचंड हादरा बसला असून या घटनेने मुंबईचा आत्‍मा हळहळल्‍याचे सांगत तिन दिवसात त्‍या किमान 300 वेळा रडल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

गोड गळ्यासह हळव्‍या मनाच्‍याही असलेल्‍या लता दीदींनी गेल्‍या तीन दिवसांपासून आपली अन्‍नपाण्‍यावरील वासनाच उडाल्‍याचे सांगून सतत तीन दिवसांपासून आपण टीव्‍ही पाहत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. या घटनेने मी प्रचंड व्‍याकुळ झाली असून देशवासीयांच्‍या दुःखाने माझं काळीज तुटत असल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले आहे.