शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 जुलै 2020 (09:26 IST)

'राजगृह' तोडफोड प्रकरणी एका आरोपीला अटक

मुंबई- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर इथल्या निवास स्थानी 7 जुलैला झालेल्या तोडफोड प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे. परेल टीटी भागात हा आरोपी राहणारा असून याला पोलिसांनी संशयीत म्हणून ताब्यात घेतलं होतं. 
 
तपासणीत तसेच सीसीटिव्ही आणि साक्षीदारांचे जबाब घेतल्यानंतर संशयीत आरोपीच मुख्य आरोपी सोबत आणखी एक व्यक्ती असल्याचं निष्पन्न झालं. उमेश जाधव असे अटक केलेल्या 35 वर्षीय तरुणाचे नाव आहे. तो बिगारी काम करतो अशी माहिती समोर आली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, त्याने हे कृत्य का केलं याबाबत पोलिसांनी अजून खुलासा केला नाही तर मुख्य आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागला नाही.