बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated :मुंबई , शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (12:02 IST)

सीफेसवर आढळले तरुणांचे मृतदेह

मुंबईच्या वरळी सी फेसला दोन वेगवेळ्या ठिकाणी दोन तरुणांचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे. काल (१३ मार्च) सकाळी ८:३० च्या सुमारास वरळी सीफेसला एक मृतदेह आढळून आले आहे. अंदाजे या तरुणाचे वय ३० ते ४० होते.  या तरुणाची ओळख अद्याप पटली नसून पोलीस त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात येत आहे. या तरुणावर नायर रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. 
 
तसेच दुसरीकडे कोस्टल रोडचे काम सुरू असलेल्या ठिकाणी एका कामगाराने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
 
 त्यांच्या आत्महत्येचे कारणही अद्याप अस्पष्ठ आहे. गळफास घेणारा मृत तरुण हा त्याच ठिकाणी कामगार म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.  पोलीस अधिक तपास करत आहेत.