रविवार, 8 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 13 ऑगस्ट 2024 (17:48 IST)

जुन्या वादातून तरुणाची भररस्त्यात तलवारीने वार करत हत्या, चौघांना अटक

murder
मुंबईच्या शिवाजी नगर भागातून एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये एका तरुणच्या हातात तलवार आहे आणि तो एका तरुणावर वार करत आहे. त्यात तरुणाचा मृत्यू झाला .अहमद पठाण असे या मयत तरुणाचं नाव आहे. व्हिडिओच्या आधारे 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना अटक केली आहे. त्यात एक महिलेचा समावेश आहे. 
 
सदर घटना 8 ऑगस्ट रोजीची आहे. मयत अहमद शिवाजीनगरच्या रस्तावर उभा असताना 3 ते 4 जण तिथे आले आणि त्यापैकी एकाच्या हातात तलवार होती. त्याने तलवारीने अहमदवर हल्ला केला. रस्त्यावरील काही जणांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने तलवार दाखवत लोकांना दूर केले. घाबरून सर्वांनी माघार घेतली. नंतर त्याने अहमदच्या मानेवर तलवारीने वार केले त्यात अहमदचा मृत्यू झाला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अहमद आणि आरोपी एकमेकांना ओळखत होते. या पूर्वी देखील त्यांच्यात वाद झाले होते. सर्व आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. आणि पाच पैकी चौघांना अटक केली आहे तर एक जण फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. आरोपींच्या विरोधात कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले
 
Edited by - Priya Dixit