सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 नोव्हेंबर 2021 (12:20 IST)

मुंबईत प्राईम मॉलला भीषण आग, आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी

मुंबईतील विलेपार्ले पश्चिम येथील प्राइम मॉलच्या पहिल्या मजल्यावर आग लागली. अग्निशमन दलाचे जवान आग विझवत आहेत. अग्निशमन दलाच्या किमान १२ गाड्या घटनास्थळी आहेत, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
 
दरम्यान, आम आदमी पार्टीचे मुंबई कार्याध्यक्ष रुबेन मस्करेन्हास यांनी ट्विटरवर फोटो शेअर करत सांगितले की, या घटनेमुळे संपूर्ण इर्ला मार्केट रोड बंद करण्यात आला आहे.
 
ही आग इतकी भीषण आहे की दूर-दूरुन दुराचे लोट पहायला मिळत आहेत. आगीची तीव्रता पाहता इर्ला मार्केट परिसरातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळू शकलेली नाहीये.
 
हा परिसर अतिशय गजबजलेला असून या परिसरात अनेक दुकाने आहेत. अग्निशमन दलाने ही लेवल तिनची आग असल्याचं जाहीर केलं आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.