शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 23 जानेवारी 2022 (13:39 IST)

मुंबईत तरुणीवर 4 जणांनी सामूहिक बलात्कार केला, 3 अल्पवयीन आरोपींना अटक

मुंबईच्या पूर्व उपनगर गोवंडीत शिवाजी नगर परिसरात शनिवारी एका 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. ही तरुणी काही केटरर्ससह काम करते.  मट्टीरोड वरील झोपडपट्टीत पहाटे ही तरुणी बसस्थानकाजवळ उभी राहून कामावरून तिच्या घरी जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे. बसस्थानकावर चार जण उभे होते आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व लोक त्या महिलेच्या ओळखीचे होते. त्यातील एकाने महिलेला सोबत घेऊन निर्जन ठिकाणी गेला. त्यानंतर त्याने आणि त्याच्यासह अन्य तिघांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले कीं, या घटनेत असलेल्या चार आरोपींपैकी तिघांना अटक केले आहे. चवथ्या आरोपी पसार झाला असून त्याचा शोध सुरु आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यानंतर महिलेने कंट्रोल रूमला फोन करून संपूर्ण घटनेची माहिती दिली. त्यानंतर महिलेला पोलिस ठाण्यात आणण्यात आले. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही आरोपींना पकडण्यासाठी 10 पथके तयार केल्या आहेत. आतापर्यंत 3  आरोपींना अटक करण्यात आली आहे.तिन्ही आरोपी अल्पवयीन आहेत. चवथा आरोपी लवकरच पकडला जाईल.असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.