रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 30 ऑक्टोबर 2024 (13:05 IST)

मर्यादेपेक्षा जास्त सामान असल्यास रेल्वे दंड आकारणार पश्चिम रेल्वेने केले जाहीर

रेल्वेने लोकांना स्थानकांवर गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. तसेच पश्चिम रेल्वेने मंगळवारी एक माहिती जारी केली आणि सांगितले की रेल्वेने त्यांच्या प्रत्येक प्रवाशाला त्यांच्या प्रवासादरम्यान कोणतेही शुल्क न घेता केवळ ठराविक प्रमाणात सामान नेण्याची परवानगी दिली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईच्या वांद्रे स्थानकावर नुकत्याच झालेल्या चेंगराचेंगरीनंतर पश्चिम रेल्वे सावध झाली असून आता या सणासुदीच्या दिवसांमध्ये रेल्वे व्यवस्थेवर बारीक लक्ष ठेवून आहे. तसेच सामान मर्यादेपेक्षा जास्त असल्यास दंड आकारला जाईल असे देखील रेल्वेने जाहीर केले आहे. 
 
तसेच पश्चिम रेल्वे स्कूटर आणि सायकलीसारख्या वस्तूंसह 100 सेमी लांबी, 100 सेमी रुंदी आणि 70 सेमी उंचीचे सामान मोफत नेण्याची परवानगी देत ​​नाही. "पश्चिम रेल्वे सर्व प्रवाशांना विनंती केली आहे की,  त्यांनी स्थानकांवर गर्दी टाळावी आणि रेल्वेच्या वेळापत्रकानुसार आवश्यक असेल तेव्हाच आवारात प्रवेश करावा आणिसामान मर्यादेचे पालन करावे," असे प्रसिद्धीपत्रकात सांगितले आहे. पश्चिम रेल्वेने सर्व प्रवाशांना मोफत सामानाच्या कमाल मर्यादेशी संबंधित नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून “विविध वर्गांच्या प्रवासासाठी मोफत सवलती वेगवेगळ्या असतात,” असे सांगितले आहे. सामान जास्त त्यानुसार दंड आकारला जाईल. ही सूचना तात्काळ लागू झाली असून ती 8 नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार आहे.
 
तसेच सणासुदीच्या काळात पार्सल बुकिंगमध्ये लक्षणीय वाढ झाली असून बांद्रा टर्मिनस, वापी, वलसाड, उधना आणि सुरत येथील पार्सल कार्यालयांमध्ये बुकिंगमध्ये वाढ झाली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून, पार्सलची खेप ट्रेनच्या नियोजित वेळेपूर्वी जास्त वेळ स्थानकातील प्लॅटफॉर्मवर ठेवू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहे.

Edited By- Dhanashri Naik